महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जून । पुण्यात (Pune Corona cases) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण निर्बंध शिथिल केल्यामुळे बेफिकरपणा समोर आला आहे. लाडक्या भुशी डॅमवर (pune bhushi dam) पर्यटकांनी एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाली आहे. पर्यटनबंदी (tourist ban) असतानाही एकच गर्दी केली आहे.
पुण्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे आज रविवार असल्यामुळे भुशी डॅमवर एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे. पर्यटन बंदी असतानाही गर्दी केली आहे. कोविडचे नियम पायदळी तुडवत पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत.विशेष म्हणजे, शनिवारी सुद्धा पर्यटकांनी अशीच गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुद्धा केली होती. पण कारवाईनंतरही आज पुन्हा पर्यटक मोठ्या संख्येने भुशी डॅमवर दाखल झाले आहे. त्यामुळे पोलीस काय कारवाई करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.