महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २० जून – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये सुरु आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर काल भारतानं तीन बाद 146 धावा केल्या होत्या. यात आज केवळ 71 धावांची भर टीम इंडियानं घातली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या होत्या. आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या.
आज भारतीय संघानं 3 बाद 146 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. विराट कालच्याच 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंत केवळ धावा काढून माघारी परतला. विराटनंतर अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला दोनशेपार पोहोचवले. चांगली सुरुवात करणारा अश्विन 22 धावांवर बाद झाला.
उपाहारानंतर जेमिसनने इशांत शर्माला (4) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (0) लागोपाठ बाद केलं. शेवटी ट्रेंट बोल्टने रवींद्र जाडेजाला (15) धावांवर बाद करत भारताचा डाव 217 धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. तर बोल्ट आणि वॅगनरनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.