म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २० जून – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसंच ग्रामीण भागात जनजागृती करणं गरजेचं आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसंच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. (Ajit Pawar reviews Corona situation in Baramati)

बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपमुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव नंदकुमार काटकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

‘म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या’
बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणं आवश्यक आहे. कोरोना पश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जादा आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी सहा मिनिटे चालायची सोपी टेस्ट करुन घ्या, जर ऑक्सिजन कमी झाल्याचे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेऊन पेशंटला ॲडमिट करावे, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *