महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – आज संपूर्ण जगात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यावर्षीचा योग थीम ‘योगा फॉर वेलनेस’ अशी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे देशातील जनतेला संबोधित करत आहे. आज संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या लढाईत योग हा आशेचा किरण समोर आला असल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जगात कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नाहीत. परंतु, तरीदेखील योग दिवसावर लोकांचे उत्साह कमी झाले नाही. यावर्षीचा योग थीम ‘योगा फॉर वेलनेस’ असून याने लोकांमध्ये आकर्षण वाढवले आहे. मी आशा करतो की, प्रत्येक देश, समाज आणि व्यक्ती निरोगी रहावे.
सुख आणि दु:खामध्ये समानता ठेवण्यासाठी आमच्या ऋषीमुनींनी संयमाला योगाचे मापदंड बनवले होते. आज कोरोना महामारीने हे सिद्ध करुन दाखवल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारतासह अनेक लहान मोठे देश आज कोरोना महामारीशी लढले आहे. जगातील मोठ्या देशांसाठी योग दिवस हा त्यांचा सांस्कृतिक उत्सव नाही. परंतु, तरीदेखील ते सर्व याचे अनुसरण करत आहेत. या कठीण काळात योगाविषयी लोकांची आसक्ती वाढली असल्याचे मोदी म्हणाले.