Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Price: सलग २ दिवस घसरणीनंतर नंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला - Maharashtra 24

Gold Price: सलग २ दिवस घसरणीनंतर नंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर सोमवारी सोन्याची किंमत पुन्हा एकदा वाढली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. MCX वर चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. तर या महिन्याच्या सुरुवातीलाही सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली होती. (Gold Price Fallen in MCX)

तसेच गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकही मोठ्याप्रमाणावर घटल्याचे निदर्शनास आले. गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक 57 टक्क्यांनी घसरुन 288 कोटी रुपये इतकी झाली आहे.

देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफ व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *