Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
महाराष्ट्रातील 'या' 15 शहरात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही - Maharashtra 24

महाराष्ट्रातील ‘या’ 15 शहरात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एक आनंदाची बातमी आहे. रविवारी राज्यातल्या 15 शहरांमध्ये एकही मृत्यूची (COVID-19 fatality) नोंद नाही आहे. मात्र दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत आहे. रविवारी राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र शनिवारी ही संख्या 8 हजार 912 इतकी होती. त्यामुळे गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचं दिसत आहे. (zero COVID-19 deaths)

रविवारी मुंबई विभाग, ठाणे, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर जिल्हा, वसई विरार आणि रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा, जळगाव शहर, सोलापूर, हिंगोली जिल्हा, परभणी, लातूर, नांदेड जिल्हा आणि शहर, अकोला, सोलापूर, अमरावती, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा आणि शहर या शहरांमध्येही कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही.

औरंगाबाद विभागील परभणी शहर, नाशिक विभागातील मालेगाव आणि धुळे शहरात काल प्रत्येकी एक- एक कोरोना रुग्णांची नोंद झाली. भिवंडी-निजामपूर शहरात दिवसभरात 5, जळगाव शहरात 3 आणि चंद्रपूर शहरात सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

रविवारी राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल राज्यातील 9101 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,19,457 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76% एवढे झाले आहे. काल 190 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97% एवढा आहे. महाराष्ट्रात शनिवारी 8 हजार 912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आणि 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी मृतांचा आकडा घटल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *