C.M.S. हायर सेकंडरी स्कूल प्राधिकरण निगडी येथे आमदार अण्णा बनसोडे यांची आज सदिच्छा भेट.

Spread the love

महाराष्ट्र २४ -ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – C.M.S हायर सेकंडरी स्कूल ही शाळा गेले 25 -26 वर्ष प्राधिकरण निगडी येथे अविरतपणे ज्ञानदानाचे काम करत आहे. या संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठे नाव कमवून आपल्या शाळेचे व शहराचे नाव उज्वल केले आहे. या शाळेच्या काही अडी-अडचणी होत्या इतर काही बाबी संबंधित माननीय आमदार साहेबांनी या भेटी वेळी चर्चा केली. व जे काही प्रश्न होते ते त्वरित सोडवण्यासाठी तेथूनच काही अधिकाऱ्यांना कॉल करून ते सोडण्यास सांगितले, व उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावू असे देखील यावेळी आमदार साहेबांनी स्पष्ट केले. व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

संस्थेने आमदार साहेबांचा वेळात वेळ काढून संस्थेला भेट दिल्याबद्दल सत्कार केला . यावेळी अध्यक्ष पी.व्ही. भास्करन , पी . अजयकुमार,एन .जी . हरिदास, पी. पुष्पकरण, मा श्री सुधीर सर. प्रिन्सिपल सौ. बिजी गोपालमार, प्रिन्सिपल सौ चैत्राली लोंढे. इत्यादी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रमेश कस्तुरे हे देखील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *