Gold Silver Price Today : सोने भाव घसरले तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जून । गेल्या आठ दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेली घसरण आजही सुरुच आहे. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरला. आज मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,120 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,120 रुपये इतका आहे. चांदीच्या भावात मात्र 200 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीसाठी आता 67,800 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या-चांदीमधील गुंतवणूक कमी झाल्याने सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत.

गेल्या आठवड्यात 16 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,410 रुपये इतका होता. तो रविवारी 47,220 रुपये इतका झाला. आज सोन्याचा भाव हा 47,120 रुपये इतका आहे. 16 जून रोजी एक किलो चांदीचा भाव हा 71,300 रुपये इतका होता, तो आता 67,800 रुपये इतका झाला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव घसरताना दिसत आहेत. सोन्याच्या भावात आजही घसरण सुरुच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाल्याचं दिसून येतंय. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात जवळपास दीड हजारांची तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचं सावट पसरले आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल काहीसा कमी झाल्याने सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *