महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जून । कराबाबतची (Tax) पूर्वीचे संकेतस्थळे (Website) कर सल्लागारांना माहिती (Information) होती. मात्र, नवीन संकेतस्थळावर कराबाबतची कामे करण्यात अनेक अडचणी (Problem) येत आहे, असे पत्र (Letter) महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठवले आहे. (New Tax Website Issues)
गरज असेल तेव्हा www.incometaxindiaefiling.gov.in हे पूर्वीचे संकेतस्थळ वेळोवेळी अद्ययावत करण्यात आले होते. मात्र, www.incometax.gov.in ही नवीन वेबसाइट आणण्यामागेच कोणतेही कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यासाठी चार हजार २४२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे, असे या पत्रात नमूद आहे.
हेही वाचा: पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये
नवीन संकेतस्थळातील तांत्रिक अडचणी :
डीएससी नोंदणी अथवा अद्ययावत करणे शक्य होत नाही
नवीन कंपन्या व संस्थांना नोंदणीस अनेक अडचणी
फॉरेन पासवर्ड सुविधा काम करत नाही
टीडीएसचे रिटर्न भरणे शक्य होत नाहीये
पटापट लॉग इन करावे लागते व त्यानंतर खाते बंद होते
२०२१-२२ चे रिटर्न दाखल होत नाहीत
परताव्यासाठीचे विनंती अर्ज करता येत नाहीत
पॅन योग्य असतानाही तो चुकीचा दर्शविला जातो
जेएसओएन सुविधा उपलब्ध नाही
वेबसाइट धीम्या गतीने काम करते