मेड इन इंडिया Honda GB350, ‘या’ दिवशी होणार लॉन्च…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जून । Honda ची नवीन मेड इन इंडिया बाईक जपानी बाजारात धमाका करण्यास सज्ज झाली आहे. कंपनी आपली ही मेड इन इंडिया बाईक 15 जुलै 2021 रोजी जपानी बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. ज्यात Honda GB 350 आणि Honda GB350 S चा समावेश आहे.

जपानी मार्केटमध्ये ही बाईक दोन नवीन पेंट स्कीममध्ये लॉन्च केली जाणार आहे. या कलर ऑप्शन्समध्ये पर्ल डीप मड ग्रे आणि गनमेटल ब्लॅक मेटलिकचा समावेश आहे. हिंदुस्थानात हीच बाईक रेडियंट रेड मेटलिक आणि पर्ल स्पोर्ट्स यलो इन ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

हिंदुस्थानात उपलब्ध असलेल्या CB350 RS या बाईकलाच जपानमध्ये GB350 S नावाने लॉन्च करण्यात येणार आहे. जपानमध्ये याची किंमत 5,94,000 येन (3.94 लाख रुपये) इतकी असू शकते. ही बाईक जपानमध्ये 15 जुलैपासून उपलब्ध होणार आहे. हिंदुस्थानात या बाईकची किंमत 1.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Honda CB350 RS मध्ये 348.6cc चे सिंगल-सिलेंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हेच इंजिन H’ness CB350 बाईकमध्येही देण्यात आले आहे. जे 5-स्पीड गीअरबॉक्ससह सुसज्ज आहे. हे इंजिन 5,500 आरपीएम वर 20.78bhp पॉवर आणि 3,000 आरपीएम वर 30Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *