भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ह्याचा सौरव गांगुलीच्या पोस्टवर सल्ला

Spread the love

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली, : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झाली. गेल्याच वर्षी युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर युवराज सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरव गांगुलीचे अभिनंदन करताना त्यानं खोचक टीकाही केली होती. आता पुन्हा एकदा त्यानं सौरव गांगुलीच्या पोस्टवर युवराजने सल्ला दिला आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गांगुली राहुल द्रविडसोबत खेळपट्टीवर दिसत आहे. याला कॅप्शन देताना जबरदस्त आठवणी असा कॅप्शन गांगुलीने दिला आहे. युवराजने यावर कमेंट करताना गांगुलीला एक सल्ला दिला आहे.

गांगुलीने शेअऱ केलेल्या फोटोवर लोगो आहे. आणि त्या लोगोसह फोटो शेअर केल्यानं युवराजने सल्ला दिला आहे. युवराज म्हणाला की, दादा लोगो तरी काढा. आता तुम्ही बीसीसीआय अध्यक्ष आहात. थोडे प्रोफेशनल व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *