पेट्रोल डिझेल सोबत आता टोल महागला, महामार्गावरील या टोलनाक्यांवर दरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जून । देशात महागाईने उच्चांक (Inflation peaks) गाठला आहे. भाजीबरोबर स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरीकडे पोहोचले आहेत. काही राज्यांत पेट्रोलने 110 रुपयांचा प्रति लिटरचा आकडा ओलांडला आहे. आता वाहनधारकांसाठी वाईट बातमी. कोल्हापूर महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. (Toll Hike Again)

कोल्हापूर आणि सातारा दरम्यान दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. किणी, तासवडे टोल नाक्यांवर ही दरवाढ करण्यात आली आहे. 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत ही टोल दरवाढ असणार आहे. येत्या एक जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे.

कोल्हापूर आणि सातारा या महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढीवर पाच रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कार जीप या वाहनांना जुना दर 75, नवा दर 80 असून हलक्या मालवाहतूक वाहनांसाठीजुना दर 135, नवा दर 145 रुपय आहे. तर ट्रक, बस आणि कंटेनरला जुना दर 265 रुपये असून नवा दर 290 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *