महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । Electricity Amendment Bill 2021: वीज दुरुस्ती विधेयक 2021: आपण जर विद्यमान वीज कंपन्याच्या सेवेबद्दल आनंदी नसल्यास, ती कंपनी बदलण्याचा अधिकार तुम्हाला असेल. लवकरच आपल्याला जुनी कंपनी सोडण्याचा आणि वीजपुरवठ्यासाठी आपल्या आवडीची आणखी एक वीज कंपनी निवडण्याचा अधिकार असेल, असे नवे विधेयक सरकार आणत आहे. जसे की आपण एखाद्या टेलिकॉम कंपनीच्या सेवांशी नाराज असाल तर आपण दुसऱ्या टेलिकॉम कंपनीला पोर्ट केले जाते.
जुलैपासून सुरु होणार्या पावसाळी अधिवेशनात सरकार वीज दुरुस्ती विधेयक (Electricity Amendment Bill 2021) लागू करू शकते, असे ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी म्हटले आहे. जर तसे झाले तर वीज वितरण क्षेत्रात ही एक मोठी सुधारणा होईल, जी ग्राहकांना मोठी शक्ती देईल. जानेवारीमध्ये मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी विद्युत दुरुस्ती विधेयक 2021 चा प्रस्ताव देण्यात आला.
ऊर्जामंत्री एका कार्यक्रमात म्हणाले की, वीज निर्मितीप्रमाणेच आम्हीही त्याचे वितरण तसा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात कॅबिनेट नोट जारी करण्यात आली होती, जी सर्व मंत्रालयांने मंजूर केली आहे. परंतु कायदा मंत्रालयाकडे एक किंवा दोन प्रश्न आहेत. ते लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असून ते संसदेच्या पुढील अधिवेशनात सादर करुन ते पारित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे.