Petrol Diesel Price Today: मुंबईत डिझेलही ‘सेंच्युरी’च्या उंबरठ्यावर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती सामान्यांसाठी चिंतेचे प्रमुख कारण ठरत आहे. मुंबईत बुधवारी एका लीटर पेट्रोलची (Petrol) किंमत तब्बल 105 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर डिझेलही लवकरच शंभरी गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी इंधनाच्या दरात जून महिन्यातील 16 वी दर वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर 34 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी कोणताही बदल झालेला नाही. (Petrol and diesel prices in Maharashtra)

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. गेल्या 33 दिवसांत पेट्रोल तब्बल 8.40 आणि डिझेल 8.47 रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?
मुंबई: पेट्रोल- 104.90, डिझेल 96.72
पुणे: पेट्रोल- 104.48, डिझेल 94.83
नाशिक: पेट्रोल- 105.24, डिझेल 95.56
औरंगाबाद: पेट्रोल- 106.14, डिझेल 97.96
कोल्हापूर: पेट्रोल- 105.00, डिझेल 95.35

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *