सोन्या चांदीचा भाव घसरला; सलग दोन सत्रात सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । करोनाची तीव्रता कमी होत असल्याने अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये विक्रीचा सपाटा लावून गुंतवणूक काढून घेतली आहे. याचे पडसाद कमॉडिटी बाजार आणि सराफा बाजारावर उमटले आहेत. कमॉडिटी बाजारात सोने ५०० रुपयांनी घसरले आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव ४६००० रुपयांखाली आला आहे.

सोने आणि चांदीमध्ये गेल्या आठवड्यात तेजी दिसून आली होती. मंगळवारी सोन्याच्या किमतीत ४१४ रुपयांची घसरण झाली तर आज सोने १२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दोन सत्रात ५०० रुपयांनी सोन्याचा भाव कमी झाला आहे. तर मंगळवारी चांदीमध्ये ९९३ रुपयांची घसरण झाली होती. आज चांदी ५० रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोमवारी बाजार बंद होताना ४६९९७ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात ७२ रुपयांची वाढ झाली होती. चांदीमध्ये २३४ रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा भाव ६९१८४ रुपयांवर स्थिरावला होता.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव ४६४६७ रुपये आहे. त्यात १२० रुपयांची घसरण झाली आहे. आज सोने ४६५५५ रुपयांवर खुले झाले होते. मात्र त्यानंतर त्यात घसरण सुरु राहिली. सध्या एक किलो चांदीचा भाव ६८४०२ रुपये असून त्यात ८० रुपयांची घसरण झाली आहे.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९०० रुपये झाला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत ३०० रुपये घसरण झाली. मुंबईत आज २४ कॅरेटचा भाव ४६९०० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६००० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५००८० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४१०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८१०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१२० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *