वडील भाजी विक्रेते , मुलगी बनली एरोइंजिनीअर! इस्रोत जाण्याचं स्वप्न

Spread the love

महाराष्ट्र २४; कर्नाटक: ललिता ही कर्नाटकातील विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठातून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शिकत होती. पहाटे लवकर उठून आई-वडिलांसोबत भाजी विकायची. नंतर कसाबसा अभ्यासाला वेळ काढून मग कॉलेजला जायचं.. हा ललिताचा दिनक्रम होता. पण जिद्दीनं तिने अभ्यास केला आणि एरोनॉटिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात ती कॉलेजमध्ये पहिली आली! तिच्या या यशाचं आणि मेहनतीचं कौतुक नोबेलविजेते कैलाश सत्यार्थी यांना देखील करावंसं वाटलं.

ललिता ही तिच्या घरातील पहिली पदवीधर आहे. तिचे वडील, आई हिरियूरमधील नेहरु मार्केटमध्ये भाजी विकतात. ललिताला या परीक्षेत तब्बल ९.७ पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. तिला याआधी GATE परीक्षेतही ७०७ गुण होते.

विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या हस्ते ललिताला सुवर्णपदक मिळाले आहे. विशेष म्हणजे इतकं शिकूनही ललिताला पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याची अजिबात इच्छा नाही. तिला इथेच काम करायचंय. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा तिच्यावर फार प्रभाव आहे. इस्रोत काम करणं हे तिचं स्वप्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *