अण्णा हजारे केजरीवालांच्या शपथविधीला उपस्थित राहणार?

Spread the love

महाराष्ट्र २४  ; नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे एकेकाळचे सहकारी आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आता तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यात आलंय. परंतु, उल्लेखनीय म्हणजे अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण अण्णा हजारे यांना मिळालेलं नाही. त्यामुळे, या शपथविधीसाठी अण्णा हजारे यंदा तरी उपस्थित राहणार का? याची उत्सुकता कायम आहे.

रविवारी, १६ डिसेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा दिल्लीच्या रामलीला मैदानात पार पडणार आहे. केजरीवाल यांनी पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांना आमंत्रण दिलं होतं. परंतु, अण्णांनी मात्र केजरीवाल यांना शुभेच्छा देताना या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. त्यानंतर केजरीवाल यांनी स्वत: अण्णा हजारे यांना फोनवरून सोहळ्याला येण्याची विनंती केली, परंतु अण्णांनी तेव्हाही त्यांना नकार कळवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

यंदाही अण्णांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांच्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. गेल्या २० डिसेंबरपासून अण्णा हजारे यांनी निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फासावर चढवा अशी मागणी करत मौन आंदोलन सुरू केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *