महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । इनरर्व्हील क्लब पिंपरी तर्फ़े करोना योद्धा, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर्स व नर्सेस यंचा “ डॉक्टर्स डे” निमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष वैशाली कुशल जैन यांनी डॉक्टर्स विषयी कृतज्ञता व्यक्त केली. “ करोना संकटकाळात वैदकिय क्षेत्रातील सर्व डॉक्टरांनी अविरत कार्य केले. स्वतःची आणि आपल्या कतुम्ब्यांचि परवा करत अस्तानाही अखंडपणे रुग्णांची सेवा केली. डॉक्टर म्हणजे दूसरा देव”, असं त्या म्हणाल्या. ही संकल्पना रुग्णांने आणि समाज़ाने प्रत्यक्ष अनुभवली. सर्व उपस्थित डॉक्टर्स व नर्सेस यांचा प्रशस्तिपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमास लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. सुनील पेंढारकर, डॉ.सुनील काळे आणि डॉ. विशाल शिरसागर व इन्नेर्व्हील क्लब पिंपरी तर्फ़े अध्यक्ष वैशाली कुशल जैन, सचिव नीलम मेहता व खाज़िंदर अर्चना रठोड़ ह्या उपस्थित होत्या. संस्थे तर्फ़े आभार नीलम मेहता यांनी आणि हॉस्पिटलच्या वतीने डॉ. सुनील पेंढारकर यांनी आभार व्यक्त केले.