आता स्मार्टफोनमध्ये ड्रोन कॅमेरा; ‘या’ कंपनीनं रजिस्टर केलं पेटंट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । वेळेसोबतच तंत्रज्ञानात अनेक नवनवीन बदल होताना दिसत आहेत. काही काळापूर्वी स्मार्टफोनमध्ये कॅमेरा असणं ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट समजली जात होती. त्यानंतर स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा आला. अशातच आता या तंत्रज्ञानात आणखी बदल होऊन स्मार्टफोनमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचं फिचर पाहायला मिळणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो (Vivo) लवकरच आपल्या फोनमध्ये फ्लाइंग कॅमेरा घेऊन येणार आहे.

Vivo ने गेल्या वर्षी या स्मार्टफोनच्या डिझाइनचं पेटेंट फाइल केलं होतं. त्यानुसार, वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये फ्लाइंग कॅमेरा मिळणार आहे. जसं की, पेटेंटमध्ये सांगितलं आहे की, हा कॅमेरा स्मार्टफोनपासून वेगळा होऊन ड्रोनप्रमाणे फोटो क्लिक करणार आहे. तसेच व्हिडीओ देखील शूट करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा स्मार्टफोन इतर स्मार्टफोनप्रमाणेच दिसणार आहे. फक्त याचा कॅमेरा खास असणार आहे.

वीवोच्या या डिटॅचेबल कॅमेऱ्यात मॉड्यूलमध्ये चार प्रोपेलर दिले आहेत. ज्याच्या मदतीनं कॅमेरा अगदी सहज हवेत उडू शकणार आहे. फोनच्या बॅटरी व्यतिरिक्त कॅमेऱ्याची स्वतंत्र बॅटरी देण्यात येणार आहे. त्याचसोबत यामध्ये दोन कॅमेरा सेन्सरही देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या फ्लाइंग कॅमेऱ्यात दोन इंफ्रारेड सेंसरही लावण्यात आले आहेत. जे उडताना कॅमेऱ्याला एखाद्या वस्तुवर आदळण्यापासून बचाव करणार आहेत.

Vivo आपल्या फ्लाइंग कॅमेऱ्यामध्ये अत्यंत खास टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत. ज्यामध्ये युजरना फॉलो मोड मिळणार आहे. यामध्ये काही एयर जेस्चरही देण्यात आले आहेत. दरम्यान, हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

वीवोच्या या फ्लाइंग फोननंतर ओप्पो, शाओमी, रिलयमी, वनप्लस या कंपन्या देखील असा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता वीवोचा हा स्मार्टफोन किती यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *