महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारपासून त्यांच्यावर खारच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अजूनही त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी आज दिली आहे.
98 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सायरा बानो म्हणाल्या, ‘‘दिलीप साहेब यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यांना रुग्णालयातून लवकरच घरी घेऊन जाण्याची आमची खूप इच्छा आहे. त्यांची वैद्यकीय स्थिती डॉक्टरांना माहिती असल्याने डिस्चार्जसाठी आम्ही डॉक्टरांच्या परवानगीची वाट पाहत आहोत. आज तरी त्यांना डिस्चार्ज मिळणार नाहीये. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा, असे मी चाहत्यांना आवाहन करते.’’