महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै ।
मेष : आज भाग्य तुमच्यासोबत आहे. कुटुंबाकडून आज प्रसन्नता अनुभवता येणार आहे. आज एखाद कार्य पूर्ण करू शकता.
वृषभ : तुमची प्रतिभा आज तुमच्या भाग्याला कारणीभूत आहे. सगळ्या कार्यात यश मिळणार आहे. प्रेम संबंधात संवेदनशीलता पाहायला मिळेल.
मिथुन : तुमचं स्वास्थ उत्तम राहिल. सगळ्यांसोबत चांगला व्यवहार असेल. धनलाभ होण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. पॉलिसी शेअर मार्केटयामध्ये गुंतवणूक करू शकाल.
कर्क : आज अनेक लोकांसोबत चर्चा करता येईल. अनेकांशी चांगले संबंध राहतील. कामाच्या ठिकाणी थोडा त्रास सहन करावाला लागेल.
सिंह : नोकरीत चांगला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. प्रमोशनकरता आजचा दिवस महत्वाचा ठरेल. दिवसाची सुरूवात चांगल्या गोष्टीने होईल.
कन्या : आज शहाणपणाचा वापर करा यश मिळेल. गरजेपेक्षा अधिक राग तुम्हाला त्रास देईल. अपत्याचं सुख महत्वाचं असेल. परमेश्वराचं स्मरण अतिशय महत्वाचं आहे.
तुळ- चातुर्याने काम करा, यश नक्की मिळेल. प्रमाणापेक्षा जास्त राग अडचणी वाढवेल. मुलांमुळे आनंद मिळेल. कोणतही काम करण्यापूर्वी वरिष्ठाचा सल्ला नक्की घ्या.
वृश्चिक- आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रांसोबत वाद होतील. पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. मुले खेळ आणि इतर मैदानी कामांवर जास्त वेळ देतील.
धनु- स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. दिवस चांगला आहे.
मकर- आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.
कुंभ- सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल
मीन- अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कार्यक्षेत्रात थोडी चूक झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. प्रेमसंबंध चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही.