महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । एमपीएससी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलाने नोकरी साठी दोन वर्षापासून इंटरव्ह्यू झाला नाही.परीणामी नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या केली झाले ते अतीशय वाईट झाले आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये…ह्या घटनेला सरकार- शासनाचा बिनडोक कारभार तर जबाबदार आहेच. कारणे काहीही असली तरी सरकारचे शासनाचे जनतेच्या हिता संबंधित निष्काळजी पणा, कमी गांभीर्य व ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. यात दुमत नाहीच. परंतू हि घटना टळू शकली असती का यावर शासन जी काही सुधारणा करेन ती करील….ते सोडून आपण जरा लक्ष केंद्रित करू या की हि घटना टळू शकली असती का???. यात मला कोणलाही दोष न देता कोणाचेही मन दुखवण्याचे हेतू न ठेवता भविष्यात आपल्याला या बाबतीत सावधानता बाळगण्याच्या हेतूने मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.
यातून इतरांनी तसेच पुढच्या पिढीने काहीतरी लक्षात घेतले पाहिजे की जी वेळ वर आली ती का आली असावी यावर विचार केला पाहीजे. मला असे वाटत कि कदाचित हि वेळ टळू शकली असती जर ह्याने एमपीएससी शिकलेला असला तरी आहे त्या परिस्थितीत वेळेवर भान राखून कोणतेही काम स्विकारले असते. तर कमीत कमी त्याची अडचणीची वेळ निघण्यास मदत झाली असती आणी हि घटना टळू शकली असती किंवा अजून एक जर त्याच्या आई वडीलांनी त्यांची आर्थिक आयपती एवढाच खर्च मुलाच्या शिक्षणावर केला असता तर मुलगा आहे त्या स्थितीत योग्य कामाला लागून गेला असता तर कदाचीत हि वेळ आली नसती. थोडक्यात आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही मुलांच्या शिक्षणासाठी आयपती पेक्षा जास्त कर्ज काढने आणि मुलाची शिक्षणाची उमेद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करने… मुले अभ्यास करून पुर्ण ती उमेद पुर्ण करतातही इथे मला अस वाटत की पालकांनी आपली आर्थिक परिस्थिती ( कर्ज परत फेडीची क्षमता ,ताकद ) बघूनच मुलांच्या शिक्षणावर खर्च केला पाहीजे. जेणेकरून असा प्रसंग येणार नाही. शेवटी असा प्रसंग आलाच तरी मुलांनी हिम्मत न हरता,व न डगमगता मिळेल ते काम करून वेळ मारून नेली पाहीजे. एकदा हि कठीण वेळ संपली की पुढे आयुष्य आहेच जिवणाचे ध्येय गाठायला. पि.के.महाजन.