महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी ने ख्रिस्तीयानो रोनाल्डोला थेट फ्री किक गोल मारण्यात मागे टाकले आहे. कर्णधार मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाला सेमी फायनलमध्ये पोहचवले आहे. काल झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने इक्वाडोरचा ३ – ० असा पराभव केला. मेस्सीने इंजुरी टाईममध्ये फ्री किकवर भन्नाट गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
मेस्सीने यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेत दमदार खेळ करत अर्जेंटिनाला सेमी फायलपर्यंत पोहचवले आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धेत ४ गोल केले आहेत तर अनेक गोलसाठी सहाय्यही केले आहे. याचबरोबरोबर त्याने आपला कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तीयानो रोनाल्डोला मागे टाकत थेट फ्री किकवर गोल मारण्यात मागे टाकले आहे.
इक्वाडोर विरुद्धच्या सामन्याआधी मेस्सी आणि रोनाल्डो हे थेट फ्री किकवर गोल करण्यात समान पातळीवर होते. या दोघांचेही ५७ फ्री किक गोल झाले होते. पण, इक्वाडोर विरुद्धच्या सामन्यात इंज्युरी टाईम मध्ये फ्री किकवर अप्रतिम गोल करत रोनाल्डोला मागे टाकले. मेस्सीची आता थेट फ्री किकवर मारलेल्या गोलची संख्या ५८ झाली आहे.
अर्जेंटिनाने गेल्या २८ वर्षात आतापर्यंत कोणतीही प्रमुख स्पर्धा जिंकलेली नाही. पण, मेस्सीच्या नेतृत्वात हा दुष्काळ संपण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाने दमदार खेळ दाखवत सेमी फायनल गाठली आहे. ७ जुलैला होणाऱ्या सेमी फायनलमध्ये त्यांचा मुकाबला कोलंबियाशी होणार आहे.