शालेय बातमी ! कोरोनामुक्त गावात ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास परवानगी शालेय शिक्षण विभागाने दिली आहेत. शाळा ज्या गावात आहेत त्या ग्रामपंचायतीने पालकांची चर्चा करुन शाळा सुरु करण्याबाबत ठराव करावा लागणार असून शिक्षकांना शाळा आहे त्या गावातच राहावे लागणार आहे. अशा अनेक मार्गदर्शन सूचना असलेले परिपत्रक सोमवारी शिक्षण विभागाने जारी केले आहे.

राज्यातील 15 जूनपासून तर विदर्भात 28 जूनपासून शाळा ऑनलाइन सुरु झाल्या आहेत. ऑफलाईन शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले घरी बसून आहेत. राज्यातील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर सध्या दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोना होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तर 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना सध्या कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शाळा बंद असल्याने मुलांवर मानसिक आणि शारिरिक दुष्परिणाम होत आहेत. मुलांमध्ये चिडचिडपणा, मानसिक आजारात वाढ झाली आहे.

पुढे जाऊन जस जसे दिवस वाढतील तर शैक्षणिक नुकसान भरणे कठीण जाईल. एका बाजूला विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर अति होत आहेत तर दुसरीकडे ग्रामीण भागात ऍन्ड्राईड मोबाईल नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. कोरोनाची लाट कमी झाली असल्याने कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. ज्या गावात शाळा सुरु करावी लागणार आहे त्या शाळांना गावकरी, पालकांसोबत ठराव करून घ्यावा लागणार आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता असतानाही शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

मात्र, शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना तो पालक आणि गावावर निर्णय देवून मात्र शिक्षण विभाग हात झटकले असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे याची अंमलबजाणी कशी होते हे पहावे लागणार आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधील गावांमध्ये कोरोना कमी झालेला नाही. गाव कोरोनामुक्त असले तरी शेजारच्या गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनामुक्त गावाचा निकष असला तरी एका शाळेत शेजरच्या चार ते सहा गावातील विद्यार्थी एका शाळेत येतात यामुळे कोरोनामुक्त गावातही शाळा सुरू होतील का, पण या विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळेतील कार्यक्रम आयोजनाबाबत निर्बंध असणार आहे. परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व इतर कार्यक्रम होणार नाहीत. अधिक गर्दी करणा-या कार्यक्रमांना शाळांत निर्बंध असणार आहे.

शाळेत ‘या’ असाव्या सुविधा

*शाळेत हात धुण्यासाठी सुविधा असावी लागणार
*थर्मोमीटर जांतूनाशक, साबणपाणी आदी आवश्यक वस्तू असाव्यात, स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने व्यवस्था करावी करावी.
* शाळा क्वारंटाईन असल्यास स्थानिक प्रशासनाने ते सेंटर दुसरीकडे हलवण्यापूर्वी संपूर्ण शाळा निर्जुतुकीकरण केली आहे का पहावे.
*क्वारंटाईन सेंटर असल्यास ते दुसरीकडे नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या मैदानात भरवावी लागणार

शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

– शिक्षकांना कोविड चाचणी करावी लागणार
-कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु करण्यास मान्यता
– पालकांना विद्यार्थ्यांना वयक्तिक वाहनाने सोडावे लागणार
– स्कूल बस असल्यास खिडक्या उघड्या ठेवाव्यात व वाहनचालक आणि वाहक व विद्यार्थी शारिरिक अंतराचे पालन असावे
-शाळा सुरु करताना मुलांना टप्प्याटप्याने बोलावे; वर्गांची अदलाबदली करून शाळा सकाळी, दुपारी भरवावी
-इंग्रजी, विज्ञान, गणीत या विषयांनाच द्यावे प्राधान्य
-एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा; दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे
-एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत
-सतत हात साबणाने स्वच्छ धुवावेत, मास्कचा वापर करावा
– विद्यार्थी आजारी असल्यास पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.
-कोरोनासदृश लक्षणे असलेल्या मुलास तत्काळ घरी पाठवावे; त्याची कोरोना चाचणी करावी
-शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात असावी; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर प्रवासासाठी करू नये
– विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व आदी शालेय साहित्यांची अदलाबदल करण्यास बंदी
– विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल स्वतः आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी शाळांनी सूचना कराव्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *