ठाकरे सरकारचा एमपीएससीबाबत मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील तरुणाने आत्महत्या केल्यामुळे सध्या राज्यात एकच खळबळ माजली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नील लोणकरने लिहिलेल्या चिठ्ठीमधून नैराश्यातून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान एमपीएससीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी आजपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. यादरम्यान सरकारकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली.

एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. विधानपरिषदेत बोलताना ही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवली आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने घेण्यात आला आहे. यासाठी शासनाने मान्यता दिल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *