Sputnik V लस मोफत देणार सरकार; पोलिओ डोससारखी गावागावात पोहोचणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । रशियाची कोरोना लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) लवकरच सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. कोरोनावरील वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन के अरोडा यांनी सांगितले की, ही लस मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या स्पुतनिक व्ही लस केवळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होती. आता सरकारद्वारे दिली जाणारी लस ही पुरवठ्यावर अवलंबून असणार आहे. आम्हाला ती मोफत लसीकरण मोहिमेतून उपलब्ध करायची आहे. (Government will give Sputnik V corona vaccine free at vaccination centers.)

Sputnik V ला १८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये साठवावी लागते. यामुळे पोलिओ डोससाठी जी कोल्ड चेन वापरली जाते तीच या लसीसाठी वापरता येणार आहे. यामुळे ही लस ग्रामीण भागात पोहोचवणे सोपे होणार आहे.अरोडा यांनी सांगितले की, पोलिओ लसीकरणामुळे काही भागात कोरोना लसीकरण धिमे झाले आहे. आता कोरोना लसीकरण पुढील आठवड्यापासून वेगाने होईल. आजवर ३४ कोटी लसी टोचण्यात आल्या आहेत. जुलैच्या अखेरीस १२ ते १६ कोटी डोस मिळतील. जानेवारीतच केंद्राने जुलैपर्यंत ५० कोटी डोस देण्यात येतील असे म्हटले होते.

कोरोना लसीकरणात मोठा वाटा कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा आहे. अरोडा यांच्यानुसार लसीकरणाचे उत्पादन वाढविण्याशिवाय, स्पुतनिक व्ही लस आणि मॉडर्ना व झायडस कॅडिलाची नवीन लस आल्यास दररोजचे ५० लाख डोस वाढून ८० लाख किंवा १ कोटी होऊ शकतात.

सरकारचे लक्ष्य या वर्षाच्या शेवटी १८ वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीला कव्हर करण्याचे आहे. डॉ. अरोडा यांनी सांगितले, ICMR च्या एका ताज्या अहवालानुसार फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज आहे. अशावेळी देशाकडे ८ महिन्यांचा वेळ आहे. तिसरी लाट डेल्टा प्लस व्हेरिअंटला जोडणे ही घाई होईल. भारतात या व्हेरिअंटचे ५२ रुग्ण सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *