अजून निवृत्तीचा विचार नाही – लसीथ मलिंगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । यॉर्कर किंग गोलंदाज लसीथ मलिंगाचे अजूनही टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघात पुनरागमन होऊ शकते. केवळ फिटनेसमुळे तो सध्या संघापासून दूर आहे, मात्र निवृत्तीचा विचार अद्याप मनाला शिवलेला नाही. मी अजूनही दोन तास गोलंदाजी करतो, असा निर्धारही लसीथ मलिंगाने बोलून दाखवला.

श्रीलंका संघात निवड होण्यासाठी क्रिकेटपटूंना दोन किलोमीटर पळण्याच्या शर्यतीत पास व्हावे लागते. 37 वर्षीय लसीथ मलिंगा या शर्यतीत पास होत नसल्याने मार्च 2020पासून त्याची श्रीलंका संघात निवड होत नाहीय, मात्र तरीही श्रीलंकेचा हा जिद्दी गोलंदाज हार मानायला तयार नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला लसीथ मलिंगा अजूनही टी-20 क्रिकेट खेळण्याची आशा बाळगून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *