विना पेडल ही सायकल चालेल 80 किलोमीटर !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । Toutcheने आपली नवीन व्हर्जन हिलियो H100 इलेक्ट्रिक सायकल भारतात आणली आहे, ज्याची किंमत 48,900 रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार एकदा या सायकलची बॅटरी पूर्ण चार्ज झाली की आपण 60 ते 80 किलोमीटर चालवू शकता.

Toutche म्हणाले की, या इलेक्ट्रिक सायकलमध्ये ली-आयन बॅटरी आणि 250 वॅटची रियर हब मोटर आहे. इलेक्ट्रिक मोड व्यतिरिक्त, सामान्य पेडल सायकल किंवा आवश्यक असल्यास पेडल-असिस्ट मोडवर चालविण्याचा एक पर्याय देखील आहे.हिलियो H100 इलेक्ट्रिक सायकल स्प्रिंग ग्रीन आणि व्हाइट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याचा फ्रेम आकार 19 इंचाचा आहे. आपण ही सायकल 2,334 रुपये प्रारंभिक ईएमआयवर घेऊ शकता. या सायकलचा वेग ताशी 25 किलोमीटर आहे.

Toutche इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक रघु केरकट्टी म्हणाले की, अलिकडच्या काही महिन्यांत ई-बाईकची मागणी वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करीत आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी नवीन ई-बाईकसह त्यांच्या इतर मॉडेलच्या बुकिंग सुरू केली आहे, हिलियो एम100, एम200 आणि एच200 सह नवीन बाईकची बुकिंग सुरु केली आहे. आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ही इलेक्ट्रिक सायकल बुक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *