ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी बातमी ! 1 ऑगस्टपासून होतोय मोठा बदल,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । आयसीआयसीआय बँकेमध्ये (ICICI Bank) तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या खाजगी बँकेत 1 ऑगस्टपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. बँकेने अशी माहिती दिली की बचत खातेधारकांसाठी (savings account holders) व्यवहार, एटीएम इंटरचेंज (ATM Interchange Charges) आणि चेकबुक शुल्कामध्ये (Cheque books) काही बदल करण्यात आले आहेत.

बँक ग्राहकांना 4 फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा देते. तुम्ही यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करून पैसे काढले तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. बँकेच्या वेबसाइटनुसार मोफत मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करण्यावर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील. हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.

बँक व्यवहारावरील शुल्क

ऑगस्ट महिन्यापासून ICICI च्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमध्ये व्यवहाराची मर्यादा दरमहा 1 लाख असेल. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. दर होम ब्रँच नसणाऱ्या शाखेमध्ये प्रति दिन 25000 रुपयांच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही आहे. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल.

एटीएम इंटरचेंज ट्रान्झॅक्शन

बँकेच्या वेबसाइटनुसार, एटीएम इंटरचेंज ट्रान्झॅक्शनवर देखील शुल्क आकारले जाईळ. 6 मेट्रो लोकेशन्सवर एका महिन्यात पहिले तीन ट्रान्झॅक्शन फ्री असतील. एक महिन्यासाठी इतर ठिकाणी पहिले पाच ट्रान्झॅक्शन मोफत असतील. यानंतर 20 रुपये प्रति आर्थिक व्यवहार आणि 8.50 रुपये प्रति गैर-आर्थिक व्यवहार

चेकबुक

तुम्हाला वर्षाला 25 चेकबुकसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. यानंतर तुम्हाला अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानं द्यावे लागतील.

कॅलेंडर महिन्यातील प्रथम रोख रक्कम काढण्यासाठी कोणत्याही रकमेवर शुल्क आकारले जाणार नाही, त्यानंतर फी असेल. यानंतर तुम्हाला पाच रुपये प्रति हजार रुपये या हिशोबाने द्यावे लागतील. याविषयी अधिक माहितीसाठी आपण बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

पैसे जमा आणि कॅश रिसायकलर

तुम्ही ICICI बँक शाखेत 5 रुपये प्रति हजार रुपये किंवा त्यातील भाग, किमान 150 च्या अधीन. कॅश रिसायकलर मशीनवर एक कॅलेंडर महिन्याच्या पहिल्या रोख ठेवीसाठी कोणतेही शुल्क असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *