पावसाळ्यात हे आजार ठरतात जीवघेणे ; कशी घ्याल काळजी ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै ।   पावसाळ्यामध्ये दमट वातावरणात (Humid Atmosphere) आणि सगळीकडेच ओलावा असल्यामुळे व्हायर इन्फेक्शन (Viral Infection) वाढायची शक्यता असते . काही आजारांची भीती वाढलेली असते. पावसाळ्यामध्ये एकाच ठिकाणी पाणी साचत त्यामुळे मच्छरांची पैदास (Breeding of Mosquitoes) जास्त प्रमाणात होते. शिवाय घाणीमुळे इतर व्हायरस,जंतू, किटाणू, बॅक्टरिया (Bacteria) वाढायला लागतात. याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो . त्यातच इम्युनिटी (Immunity) कमजोर झाल्याने लवकर आजार होऊ शकतात. जाणून घेऊयात पावसाळ्यामध्ये कोणते आजार होतात.

येलो फिव्हर

येलो फिव्हर म्हणजेच पिवळा ताप मच्छरांच्या चांवण्यामुळेच होतो. हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. ईडीस ईजिप्टी (स्टीगोमिया फेसियाटा) जातीच्या मच्छराच्या चावण्यामुळे हा आजार होतो. येलो फिव्हर झाल्यानंतर रुग्णांमध्ये काविळीची लक्षणं दिसायला लागतात. लिव्हर फंक्शनिंगवरती परिणाम होतो.

टायफाईड

पावसाळ्यामध्ये इतर आजारांप्रमाणे टायफाईड होण्याची भीती जास्त असते. दूषित पाणी आणि जेवणामधून हा आजार होण्याची भीती असते. तिव्र ताप येणं आणि न उतरणं पोटदुखी ,डोकेदुखी, अंगदुखी, पोट खराब होणं. ही लक्षणं टायफाईडमध्ये दिसतात.त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि उकळलेलं पाणी प्या.

 

डेंग्यू

पावसाळ्यामध्ये डेंग्यूचे मच्छर देखील वाढतात. यामुळे डेंग्यू होण्याची भीती असते. डेंग्यू झालेल्या व्यक्तीला शरीरात आणि सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात. शिवाय थंडी भरून तापही येतो. तज्ज्ञांच्या मते एडीस जातीच्या मच्छराची मादी चावल्यानंतर 3 ते 14 दिवसांच्याआत ही लक्षणं दिसायला लागतात.त्यामुळेच आपल्या परिसरामध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्या.

 

मलेरिया

मलेरिया हा जीवघेणा ताप आहे. एनिफिलीज जातीच्या मच्छराची माजी चावल्यामुळे हा ताप येतो. मलेरिया झालेल्या व्यक्तीला थंडी वाजून ताप येतो. कधी कधी 101 ते 105 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत ताप येऊ शकतो. याशिवाय लिव्हरवर सूज येणं, श्वासोच्छ्वासाचा त्रास, डोकेदुखी, पोटदुखी, उलटी, चक्कर, लूज, मोशन्स आणि अनिमिया अशी लक्षणं देखील मलेरियामध्ये दिसायला लागतात.

 

चिकनगुनिया

एडिस मच्छर चावल्यामुळे चिकनगुनिया देखील होऊ शकतो. चिकनगुनियाची लक्षणं डेंगू सारखीच असतात. त्यामुळे लवकर लक्षात येत नाहीत. चिकनगुनिया झाल्यामुळे थकवा येतो ,खूप जास्त ताप येऊन असह्य सांधेदुखी व्हायला लागते. यामुळेच घरात मच्छर येणार नाहीत याकडे लक्ष द्या. पावसाळ्यामध्ये दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *