Gold Price: सोनं खरेदी करण्याची चांगली संधी; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट मर्यादेत वरखाली होत असलेले सोन्याच्या किंमतीत मंगळवारी किंचीत वाढ पाहायला मिळाली होती. मल्टी कमोडिटी एक्सेंजवर (MCX) 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 120 रुपयांनी वाढली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold) 1200 रुपयांनी वाढला. त्यामुळे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे प्रतितोळा 46400 आणि 47400 रुपये इतकी झाली होती. त्यामुळे सध्या सोने सार्वकालिक उच्चांकापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त भावात मिळत आहे. (Gold rates on MCX commodity Market)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याच्या किंमतीने गेल्या तीन आठवड्यांमधील नव्या उच्चांकाला गवसणी घातली. स्पॉट गोल्डची किंमत 0.4 टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस 1, 798. 46 डॉलर्सवर पोहोचली. अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणावर सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाटचाल अवलंबून आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *