Weather Update: राज्यात पावसाचा खंड ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, जूनच्या अखेरच्या दिवसानंतर राज्यातील विविध ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. विदर्भात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. सुरुवातीच्या पावसाच्या जोरावर विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचं दिसून येत आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन पिकांच्या दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता आहे. (Weather Update Vidarbha farmers facing problem due to lack of rain during Monsoon Season )

मान्सूनच्या पावसामध्ये विदर्भात मोठा खंड पडला असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन पिकांच्या दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. पावसाचा 10 ते 15 दिवसांचा खंड पडल्याने पिकं करपायला लागली आहेत. पावसानं दडी मारल्यानं धान रोपांचे पऱ्हे करपल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकरी मान्सून दाखल होतो तेव्हा पैशांची तजवीज करुन पेरणी आणि इतर कामं उरकतो. आता मात्र, पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. दुबार पेरणीसाठी बियाणं – खतं खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सरकारनं मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *