Petrol Diesel 9 July : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन उंचीवर ; आजचे दर काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । सलग दोन दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर शुक्रवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नसून किमती स्थिर आहेत. म्हणजेच, आज तेल कंपन्यांनी किमती वाढवलेल्या नाहीत. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 106.59 प्रति लिटर इतकी आहे. तसेच दिल्लीत डिझेलची किंमत 89.62 रुपये आणि मुंबईत 97.18 रुपये इतकी आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या किमतींमध्ये 35 पैसे प्रति लिटरनं तर डिझेलच्या दरात 9 पैशांची वाढ केली होती.

1 मे रोजी 90.40 रुपये प्रति लिटरच्या किमतीपासून सुरु होऊन आता देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रति लिटर झाली आहे. म्हणजेच, गेल्या 70 दिवसांत 10.16 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. अशाच प्रकारे राजधानीत डिझेलची किंमतही गेल्या दोन महिन्यांत 8.89 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे.

इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :

मुंबईत आज पेट्रोल 106.59 रुपये आणि डिझेल 97.18 रुपये प्रति लिटर
कोलकाता मध्ये आज पेट्रोल 100.62 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर
चेन्नईत आज पेट्रोल 101.37 रुपये आणि डिझेल 94.15 रुपये प्रति लिटर
बंगळुरुत आज पेट्रोल 103.93 रुपये आणि डिझेल 94.99 रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *