सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम : 12 जुलैपासून मिळेल स्वस्त सोनं, , जाणून घ्या सविस्तर

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । जर तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी (Gold Price) करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा तर तुमच्यासाठी सोमवारी एक शानदार संधी मिळणार आहे. सोमवारपासून म्हणजेच 12 जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपर्यंत होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) जारी केलेल्या या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारच्यावतीने आरबीआय सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) जारी करते. अशावेळी तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या सविस्तर माहिती….

सॉव्हरेन गोल्ड बाँड 2021-22 चा चौथा हप्ता सोमवारपासून पाच दिवसांसाठी सब्सक्रिप्शनसाठी सुरू होणार आहे. आरबीआयच्या मते, सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठी जर तुम्ही ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,757 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

तुम्ही गोल्ड बाँडची खरेदी ऑनलाइन करू शकता. याशिवाय याची विक्री बँक, सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमध्ये यांची विक्री केली जात नाही.

सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड (Gold Bond) जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link