SBI Clerk Exam 2021 : आजपासून SBI क्लर्क परीक्षेला प्रारंभ; जाणून घ्या माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लर्क या पदासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा आजपासून सुरु होत असून ती 13 जुलैपर्यंत घेण्यात येणार आहे. सेंट्रल रिक्रुटमेंट अॅन्ड प्रमोशन डिपार्टमेंटकडून शिलॉंग, अगरतळा, औरंगाबाद आणि नाशिक या चार केंद्रांचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी या पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे. SBI क्लर्क पूर्व परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रात घेण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यानी आपले प्रवेशपत्र आणि एखादे ओळखपत्र घेऊन येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी किमान 15 मिनीटे पोहोचावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.

या केंद्रावरील परीक्षा स्थगित
काही कारणांमुळे शिलॉंग, आगरतळा आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या केंद्रावर पुन्हा परीक्षा कधी होणार ते निवेदन करुन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या मुलांनी शिलॉंग, आगरतळा आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक ही परीक्षा केंद्रे दिली आहेत त्यांना तशा पद्धतीचा ई मेल करण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेजही करण्यात आला आहे.

अशी असेल परीक्षा पद्धत

 

परीक्षा पद्धत- ऑनलाईन
परीक्षा कालावधी- एक तास ( प्रत्येक सेक्शन साठी 20 मिनीटे)
सेक्शन- चार- इंग्रजी भाषा, न्यूमेरिकल अॅबिलिटी, रिजनिंग अॅबिलिटी, जनरल नॉलेज
एकूण प्रश्न- 100
एकूण मार्क- 100
प्रत्येक प्रश्न- 1 मार्क
चुकीच्या प्रश्नावर 0.25 मार्क वजा करण्यात येतील.

स्टेट बँकेतील क्लर्क भरतीसाठी एसबीआयकडून दरवर्षी परीक्षा घेण्यात येत असून ती पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यात घेण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *