इंधन दरवाढीवर नितीन गडकरींची घोषणा ; पुढील तीन महिन्यांत मोठा निर्णय घेणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरमध्ये देशातील पहिल्या एलएनजी पंपाचे (LNG Pump) उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक विरोध करत आहेत. यामुळे आता आपण पर्यायी इंधनांकडे वळण्याची गरज निर्माण झाल्याचे गडकरींनी सांगितले. (Nitin Gadkari inaugurates country’s first LNG facility plant at Nagpur)

एलएनजीमध्ये ट्रक, बस कन्ह्वर्ट करण्यासाठी १० लाखांचा खर्च आहे. सरासरी या वाहनांचे वर्षाचे रनिंग हे ९८ हजार किमी आहे. यामुळे एलएनजी कन्व्हर्ट केलेले असल्यास वर्षाला तुमचे ११ लाख रुपये वाचणार आहेत. डिझेलमुळे तुमचा खर्चा जास्त होत आहे. हा खर्च ३५ टक्क्यांवर येणार असून ६५ टक्के फायदा राहणार आहे. एलएनजीमध्ये केलेली गुंतवणूक ही २९५ दिवसांतच भरून निघणार आहे. पुढे फायदाच फायदा असेल असे गडकरी म्हणाले.

नागपूरमध्ये एलएनजी भरला की ते वाहन ८०० किमी चालणार आहे. यामुळे मुंबई, हैदराबाद सारख्या शहरांना जाताना येताना एलएनजी पंप उभारावे लागणार आहेत. असे केल्यास वाहतूकीचा खर्च कमी होणार असून डिझेलवरील सरकारचे तसेत वाहन मालकाचे पैसे वाचणार आहेत, असे गडकरी म्हणाले.

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवर नितीन गडकरी यांनी फ्लेक्स इंजिनचा पर्याय ठेवला आहे. वाहन निर्माता कंपन्या ज्या भारतात वाहने विकतात त्यांच्या फ्लेक्स इंजिन असेलेल्या गाड्या कॅनडासारख्या देशांमध्ये आहेत. त्या कंपन्यांना भारतातही य़ापुढे फ्लेक्स इंजिनचा पर्याय देण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. हा निर्णय येत्या तीन महिन्यांत घेण्यात येईल, असे ते म्हणाले. यात मोठे काही नाही, एक छोटा पार्ट बदलायचा आहे, आणि इंजिनमध्ये थोडे बदल करायचे आहेत. मग हे इंजिन इथेनॉलवर देखील चालणार आहे. या वाहनांच्या किंमती आणि पेट्रोल वाहनांच्या किंमतीत मोठा फरक नाहीय, असेही गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *