कसोटी मालिकेसाठी किवी संघाची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ –  टी-२० मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने वन-डे मालिकेत दमदार पुनरागमन केलं. ३-० ने मालिका जिंकत न्यूझीलंडने टी-२० मालिकेतील पराभवाचा वचपा काढला. २१ फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आगामी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी यंदा सर्व संघ कसोटी सामन्यांना अधिक महत्व देत आहेत.

न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली असून, १३ जणांच्या संघात कायल जेमिन्सनला संधी देण्यात आलेली आहे. असा आहे न्यूझीलंडचा कसोटी संघ…

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बी.जे. वॉटलिंग, कॉलीन डी-ग्रँडहोम, टीम साऊदी, निल वँगर, ट्रेंट बोल्ट, एजाझ पटेल, कायल जेमिन्सन, डॅरेल मिचेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *