महाराष्ट्र २४ – मुंबई : गेल्या महिन्याभरापासून जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यामुळे चीनची अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. मात्र यादरम्या एक चांगली माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या व्हायरसचा आपल्याला फायदा होणार आहे. ऐकून थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे.
जेव्हापासून चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरत आहे. तेव्हापासून भारत पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. अशी आशा वर्तवली जातेय की आगामी काळात याचा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाली. मात्र चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढल्यामुळे तेलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता नाही.
इंटरनॅशनल एनर्जी एजेंसीच्या म्हणण्यानुार, यावर्षी पहिल्या तिमाहित कच्चा तेलात घसरण होणार आहे. 4.35 टक्के घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी कपात झाली आहे. तर गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल चार रुपयांनी आणखी स्वस्त झालं आहे.
उर्जा विशेषतज्ञ नरेंद्र तनेजा यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसमुळे चीनची परिवहन व्यवस्ता आणि उद्योग धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. ज्यामुळे कच्चा तेलाची मागणी घटली आहे. यामुळे किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे.