परिक्षेच्या तयारीच्या दिवसांत तणाव सर्वाधिक असतो. याचा परिणाम परिक्षेच्या वेळी जाणवतो. अनेकदा विद्यार्थी परिक्षेच्या हॉलमध्ये अनेक उत्तर विसरतात. विनाकारण तणावात राहतात. हे टाळण्यासाठी सुरूवातीपासूनच काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये जिंक तत्व अधिक असते. याचा परिणाम मानसिक स्वास्थावर होतो. यामुळे बुद्धी तल्लख होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यांच सेवन करा.
१}अक्रोड- अँटी ऑक्सीडंट्सं प्रमाण अक्रोडमध्ये सर्वाधिक असतं. यामुळे स्मरणशक्तीत वाढ होते. 20 ग्रॅम अक्रोड खाल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. याचं सेवन विसरण्याची सवय कमी करते.
२} ऑलीव्ह ऑईल- या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी करा. यासोबतच पोळ्यांना तूप लावा. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. यामुळे विद्यार्थ्यांनी याचं सेवन नक्की करावं.
३} बदाम -काही बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची सालं काढून बारीक कापून त्याची पेस्ट करा. एका ग्लासत कोमट दूध घेऊन 3 चमचे मध घालून मिश्रण प्या. याचा तुम्हाला जास्त फायदा होईल.
४} मनुके- यामध्ये विटॅमीन सीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. दररोज सकाळच्या वेळी 15 ते 20 मनुके रात्री भिजवून खा. यामुळे रक्तातील कमतरता दूर होते. यामुळे तुमचा मेंदू अतिशय तल्लख राहतो. (Food to boost memory power)
५} टोमॅटो- यामध्ये अँटीऑक्सीडंट अधिक प्रमाणात असते. दररोज सलाडच्या रुपात टोमॅटो खाणं फायदेशीर असतात. (Brain Food for Students) त्यामुळे दररोज टोमॅटोचं सेवन करणं गरजेचं आहे.