महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold Price Today) आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. अशावेळी तुम्ही सोनंचांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Rates) 47,340 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे.
दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,410 रुपये प्रति तोळा आहे, मुंबईमध्ये दर 47,340 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये दर अनुक्रमे 45,420 रुपये आणि 47,660 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये 51,710 रुपये, मुंबईमध्ये 48,340 रुपये, चेन्नईमध्ये 49,550 रुपये आणि कोलकातामध्ये 49,760 रुपये प्रति तोळा आहे.
दिल्ली- 68,400 रुपये प्रति 1 किलोग्रॅम
मुंबई- 68,400 रुपये प्रति 1 किलोग्रॅम
हे वाचा-Master Card Ban मुळे बँकांमध्ये तणाव! SBI, Axisसह 5 बँका होणार प्रभावित
चेन्नई- 73,200 रुपये प्रति 1 किलोग्रॅम
कोलकाता- 68,400 रुपये प्रति 1 किलोग्रॅम