महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । पर्यटनस्थळी जमावबंदी असतानाही लोणावळ्यातील भुशी डॅमवर गर्दी करणाऱ्या पर्यटकांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. जंमावबंदी झुगारून पर्यटक गर्दी करत असल्याचं चित्रं भुशी डॅमवर गेल्या काही वीकेंडला दिसलं. त्यावेळी पोलिसांनी पर्यटकांना हिसकावून लावलं होतं. शनिवार, रविवारी अतिउत्साही पर्यटक लोणावळ्यात गर्दी करतात. आजही भुशी डॅमवर सकाळीच दाखल झाले. पोलिसांनीही त्यांना लगेच हिसकावून लावायला सुरुवात केली.