![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १६ डिसेंबर २०२५ | सराफा बाजारात सोन्याचे दर पुन्हा एकदा उसळी घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीमुळे सोनं सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मंगळवारी (१६ डिसेंबर २०२५) देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आली असून, चांदीच्या दरातही किरकोळ बदल झाला आहे. लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या मागणीमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव कायम असल्याचे चित्र आहे.
बुलियन मार्केटनुसार, आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३३,९६० रुपये इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,२२,७९७ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. याचबरोबर १ किलो चांदीचा दर १,९५,९४० रुपये, तर १० ग्रॅम चांदीचा दर १,९५९ रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे दागिन्यांच्या किमती शहरानुसार वेगवेगळ्या असतात.
प्रमुख शहरांतील आजचे दर जवळपास समान आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे २२ कॅरेट सोन्याचा दर १,२२,५६८ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १,३३,७१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. (हे दर सूचक असून, कर आणि मेकिंग चार्जेस वेगळे असू शकतात.) वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी खरेदीपूर्वी स्थानिक सराफ्यांकडून अचूक दरांची खात्री करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
