महाराष्ट्र २४ – पुणे : दिल्लीत राजकारण करायचे सोपे नाही, असे नेहमी म्हटले जाते; पण आपल्या वेगळ्या शैलीने राजकारणाचा चेहरा बदलत अरविंद केजरीवाल यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यामध्ये त्यांनी दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील सरकारी शाळांचा बदललेला लूक आणि शिक्षणाच्या बाबतीत घडवून आणलेल्या आमूलाग्र बदलाची देशभर चर्चा सुरू झाली आहे.
कायम राजकारणाची भाषा करणारेही आता शिक्षणाचा केजरीवाल पॅटर्न राबविण्याचा विचार जाहीरपणे बोलून दाखवीत आहेत.
शाळा सुधारणे आणि मोहल्ला दवाखाने या माध्यमातून केजरीवाल सर्वसामान्यांच्या घराघरांत पोहोचले. तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात राबविण्यासाठी राज्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.
…असा राबविला दहा कलमी कार्यक्रम
1) शाळा व आवाराची स्वच्छता.
2) मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स.
3) विद्यार्थी समस्या सोडविणे.
4) वाचन सुधारण्यासाठी अभियान.
5) शिक्षक पालक समिती.
6) विद्यार्थी उद्योजक होण्यावर भर.
7) शिक्षकांच्या नव्या संकल्पनाचे स्वागत.
8) विद्यार्थी क्षमता वाढ.
9) सरकारचा कमी हस्तक्षेप.
10) शिक्षणमंत्र्यांचे विशेष लक्ष.