विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कार्यकर्त्यांना आवाहन ; वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी वाढदिवस (Birthday) आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव नको असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाचे कोणत्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच वृत्तपत्र, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नयेत असं आवाहन केलं आहे.

यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे.

एवढंच काय तर होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *