केंद्र सरकार महागाई वाढवून जनतेला मरणाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.- तुषार काळोखे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । तळेगाव दाभाडे येथील युवा नेते तुषार काळोखे यांचे महागाई विरुद्ध केंद्र सरकारला खडे बोल . कोरोनाच्या काळात नागरिक पहिलेच आर्थिक संकटात असताना , बेरोजगारी,  कोणच्या घरातील कर्ता व्यक्ती या महामारी मध्ये गेला असेल. त्यातच जनतेवर लादलेली ही महागाई , केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अयशस्वी , इंधन दर वाढीमुळे खाद्यतेल, अन्नधान्य , भाजीपाला , सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत . सर्वसामान्य जनतेनी जगायचे कसे असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला . सोबत त्यांनी २०१३ आणि २०१४ भाजप च्या सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांनी महागाई विरोधात रोड वर उतरून केलेल्या आंदोलनाची देखील आठवण करून दिली . तसेच मनमोहन सिंग यांना जे प्रश्न केले तेच प्रश्न आज मोदींना विचारण्याची वेळ आली आहे अशी सूचना देखील केली . तसेच ही महागाई आटोक्यात आणली नाही तर येणाऱ्या काळात जनता आपल्याला आपली योग्य जागा दाखवेल…..

पहा संपूर्ण मुलाखत युथ मावळ न्युज वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *