Gold Price Today : सोनं-चांदी दरात घसरण ; चेक करा आजचे रेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत बरेच चढउतार पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. दरम्यान आज सोनं खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. सोनं आणि चांदीची (Gold price today) खरेदी करणाऱ्यांसाठी आज चांगली बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारातही सोने आणि चांदींच्या किमती पडल्या आहेत. MCX (Multi commodity exchange) वर सोनं 48,076 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदी 0.4 टक्के म्हणजे 274 रुपयांची घट झाली असून 68045 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवसाय करीत आहे. गेल्या सत्रात सोन्यात 400 रुपये प्रति ग्रॅमने घट झाली होती.

इंटरनेशनल मार्केटमध्येही सोन्याचे दर साधारण स्तरावर आहेत. शुक्रवारी बाजार बंद होत असताना सोन्याचे दर 48273 रुपये प्रति तोळा होते. या हिशोबाने सोन्याच्या दरात 410 रुपयांची वाढ झाली आहे.

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

जाणकारांच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणुकदार चांगला फायदा कमावू शकतात. सोन्यामधील गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सध्या सोनंखरेदीसाठी उत्तम वेळ आहे आणि सोनं हा एक चांगला पर्याय देखील आहे, ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *