Gold Silver Price Today : सोनं चांदी दरात घसरण , जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेली किरकोळ घसरण आजही सुरु राहिली असून आज सोन्याचे दर 150 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याच्या एका तोळाचा भाव हा 48,040 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,040 रुपये इतका आहे. चांदीच्या भावातही आज पुन्हा एकदा 600 रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीसाठी आज 67,800 रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या आठवड्यात सुरुवातीला तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर शेवटच्या चार दिवसांत किरकोळ घसरण झाल्याचं पहायला मिळालं. 16 जुलैला 130 रुपये, 17 जुलैला 150 रुपये, 18 जुलैला 10 रुपये तर काल पुन्हा एकदा 150 रुपयांची घसरण झाली. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. पण येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास नऊ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून आलं आहे. 14 जुलैला चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण, 15 जुलैला 300 रुपयांची वाढ, 16 जुलैला 200 रुपयांची वाढ झाली होती. 17 तारखेला 1300 रुपयांची घसरण तर काल पुन्हा एकदा 600 रुपयांची घसरण झाली आहे. 7 जुलै रोजी चांदीच्या भावाने 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *