महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । पावसाळा आला की अनेक रोगांचा फैलाव होतो . पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वत: ला वाचवण्यासाठी हेल्दी पदार्थांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपल्याला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि संक्रमणास विरोध करण्यासाठी मदत होते.
भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अनेक पौष्टिक पदार्थ असतात. हे आपल्याला ऊर्जावान बनविण्यात मदत करते. निरोगी राहण्यासाठी तुम्ही भाजलेले चणे सेवन करु शकता.
पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही फ्रूट चाटचे सेवन करु शकता. यासाठी आपली आवडती फळे कापून घ्या. त्यात मीठ आणि मिरपू
सुका मेवा – काजू, बदाम आणि अक्रोडचे सेवन प्रत्येक हंगामात फायदेशीर असते. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पावसाळी आहारात आपण त्यांचा समावेश करू शकता. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.