राज कुंद्रा अकडलाय अनेक प्रकरणांत ; पोर्न फिल्म ते सट्टेबाजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । अनेक वादग्रस्त प्रकरणांत अडकलेला राज कुंद्रा आता पोर्न फिल्म प्रकरणी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती असलेला राज कुंद्रा फसवणुकीपासून ते पोर्न फिल्म पर्यंत अनेक प्रकरणांत अडकला आहे.या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला असून कुंद्राविरोधात पुरावे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पुराव्यांच्या आधारेच त्याला अटक करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याची सोमवारी आठ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ॲप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.राज कुंद्राचे यात नाव पुढे आल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याची सात ते आठ तास चौकशी करण्यात आली.पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल ॲप्सवर प्रदर्शित केल्या जात होत्या.याची माहिती पोलिसांना मिळाली.

भक्कम पुरावे मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्याला आज (ता. २०) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती.अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या होत्या.

कुंद्रा अनेक संशयास्पद प्रकरणांत?
२०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्चीशी व्यावसायिक करार केल्याच्या प्रकरणात संबंध असल्याने राज कुंद्रा याला ईडीने समन्स बजावलं होतं.

राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्यासंदर्भातली माहिती आढळली.

या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आले. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे.

बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने २०१८ साली समन्स बजावले होते. २ हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचे सांगण्यात आले होते.

हे प्रकरण मनी लॉन्डरिंगशी संबंधित आहे. त्याच अनुषंगाने राज कुंद्राची चौकशी झाल्याचे आणि त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते.

राज कुंद्रा यांने आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी त्याची आयपीएलमधून हकालपट्टी झाली होती. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्याला हयात असेपर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. तो राजस्थान रॉयल्सचा सहमालक होता. या संघावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.२०१७ मध्येही ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *