क्रिकेट रसिकांसाठी ठरणार पर्वणी.. ; आज एकाच दिवशी भारताचे दोन संघ एकाचवेळी मैदानात उतरणार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । आजच्या दिवशी भारतीय चाहत्यांसाठी एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. कारण आजच्या एकाच दिवशी भारताचे दोन संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी भारताचे २२ खेळाडू आणि दोन कर्णधार खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना आज रंगणार आहे. हा सामना आज दुपारी ३.०० वाजता सुरु होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात धडाकेबाज विजय साकारला आहे. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या खिशात टाकणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. दुसरीकडे भारताचा अजून एक संघ इंग्लंडमध्ये आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका येत्या काही दिवसांमध्ये खेळवण्यात येणार आहे. पण आज भारतीय संघ कौंटी सिलेक्शन इलेव्हन या संघाबरोबर सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे एकाच वेळी धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही सामन्यांमध्ये भारताची कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. एक आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचा एक खेळाडू आता फिट झाला आहे. संजू सॅमसनला दुखापतीमुळे त्याला पहिल्या वनडेत अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. पण इशान किशनने पहिल्या वनडेत शानदार कामगिरी केल्यामुळे दुसऱ्या वनडेत देखील त्याचे स्थान निश्चित मानले जात आहे. त्यामुळे फिट असून देखील संजू दुसरी वनडे खेळू शकणार नाही. संजूने अद्याप वनडेत पदार्पण केले नाही. त्यामुळे या सामन्यात तो या सामन्यात खेळणार का, हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *